Date: Aug 10, 2019 12:06 pm राज्य शासनाकडून पूरग्रस्तांना १५४ कोटींचा निधी, रोखीने मदतमुंबई : पश्चिम महाराष्ट्रात पुराने हाहाकार माजवला आहे. अनेकांचे संसार वाहून गेलेत.अनेकांची कुटुंब उघड्यावर आली आहेत. त्यांच्या मदतीसाठी मात्र तोकडे प्रयत्न होताना दिसून येत आहेत. अनेक जण आजही पुरात अडकले आहेत. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचण्यास उशीर होत आहे. अनेकांचे पुराने बळी घेतले आहेत. दरम्यान, पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्य शासनाने १५४ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यातून ग्रामीण भागातील आपत्तीग्रस्त नागरिकांना प्रतिकुटुंब १० हजार तर शहरी भागातील प्रति कुटुंब १५ हजार रुपये मदत करण्यात येणार आहे. ही मदत तातडीने वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही मदत चेक ऐवजी रोखीने देण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मात्र, राज्य सरकारकडून देण्यात येणारी ही अपुरी मदत असल्याची टीका होत आहे.